Uddhav Thackeray यांना मोठा धक्का ; सहा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार

122
Uddhav Thackeray यांना मोठा धक्का ; सहा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार
Uddhav Thackeray यांना मोठा धक्का ; सहा नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार

दापोलीत उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला आणखी मोठा धक्का बसत आहे. दापोली नगरपालिकेत सुरुवातीला पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नेतृत्वात शिवसेनेमध्ये (Shiv Sena) प्रवेश केला होता. आता उर्वरित आठ नगरसेवकही धनुष्यबाण हाती घेणार आहेत. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह सहा नगरसेवकांचा आज (28 फेब्रु.) शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. (Uddhav Thackeray)

हेही वाचा-पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश D. Y. Chandrachud काय म्हणाले ?

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. नगरसेवकांचा एक गट शिवसेनेचा झाल्यामुळे दापोली नगर पंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 नगरसेवकांपैकी 14 नगर सेवक शिंदेच्या शिवसेनेकडे आले आहेत. (Uddhav Thackeray)

हेही वाचा-महाकुंभमेळ्याची सांगता होताच PM Narendra Modi यांनी पोस्ट लिहीत का मागितली माफी?

कोकणात उद्धव ठाकरे गटाला मोठ खिंडार पडलं आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत मोठ्या संख्येने ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली होती. (Uddhav Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.