काँग्रेसला धक्का…आमदार Sulbha Khodke पक्ष सोडणार; सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून केले निलंबित

163
काँग्रेसला धक्का...आमदार Sulbha Khodke पक्ष सोडणार; सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून केले निलंबित
काँग्रेसला धक्का...आमदार Sulbha Khodke पक्ष सोडणार; सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून केले निलंबित

पक्ष विरोधी कारवाई केल्याने अमरावती विधानसभा (Amravati Assembly) मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके (MLA Sulbha Khodke suspended) यांना काँग्रेस पक्षातून (Congress Party) सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान सुलभा खोडके अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. (Sulbha Khodke)

Untitled design 25

(हेही वाचा – Navratri Utsav 2024 : महापालिकेच्या जी -दक्षिण विभागाने साजरा केला अनोखा नवरात्रौत्सव)

मागील काही काळापासून सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. तसेच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांवर ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामध्ये सुलभा खोडके यांचे देखील नाव असल्याची चर्चा होती, तर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ज्या पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवला होता त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभा खोडकेंचं नाव होतं. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारादरम्यान त्या कुठे दिसल्या नाहीत. (Sulbha Khodke)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.