मनसेला धक्का; पनवेलमधील 100 पदाधिका-यांनी केला शिंदे गटात प्रवेश

85

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत होताना दिसत आहे. आता मनसेचे पनवेलमधील 100 पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे बळ वाढलेले दिसत आहे.

100 मनसे पदाधिकारी शिंदे गटात

एकनाथ शिंदे गटाने पनवेलमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडल्याचे, चित्र आहे. पनवेल आणि उरणमधील मनसेच्या 100 पदाधिका-यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. सोमवारी रात्री उशिरा मुंबईमधील मलबार हिल येथील शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात हा पदाधिका-यांचा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

( हेही वाचा: राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशावर ‘शिंदेंचं नाव’, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले… )

शिवसेनेला कुठे- कुठे खिंडार?

  • ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला
  • नवी मुंबई पालिकेतील 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला.
  • नवी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या 38 पैकी 28 नगरसेवकांनी महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.