धक्कादायक! मुसलमानांमध्ये कोरोना लसीबाबत सर्वाधिक गैरसमज! आरोयमंत्र्यांची पुष्टी 

मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे. मुस्लिमांमध्येअसलेले गैरसमज दूर होतील व तेदेखील लसीकरणाला प्रतिसाद देतील ही आशा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 

केंद्र सरकारने याआधी लहान मुलांना गोवर-रूबेरा नावाची लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता, तेव्हा मुसलमानांमध्ये ही लस घेतल्याने मुलींची प्रजनन क्षमता कमी होते, असा अपप्रचार करून मुसलमानांनी मुलांना ही लस दिली नव्हती. आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीमध्ये डुकराच्या मांसाचा अंश आहे, त्यामुळे ही लस मुस्लीम धर्मविरोधी आहे, असा अपप्रचार होऊ लागला, तर काही ठिकाणी ही लस घेतल्याने पुरुषांमध्ये नपुसंकता येते, असाही अपप्रचार होत आहे. त्यामुळे मुसलमानांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याला विरोध आहे. याला आता खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत पुष्टी दिली आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?  

  • लसीकरणाचे दिवसाला सहा लाखाचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे.
  • त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
  • गावागावात न घाबरता लसीकरण झाले पाहिजे.
  • अनेकांमध्ये गैरसमज असून, काहीजण पसरवत आहे. मुस्लिमांमध्ये या लसीबाबत गैरसमज आहेत.
  • आम्ही ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुस्लीम धर्मगुरू व राजकीय नेत्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
  • मुस्लिमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे.
  • मुस्लिमांमध्येअसलेले गैरसमज दूर होतील व तेदेखील लसीकरणाला प्रतिसाद देतील ही आशा आहे.

(हेही वाचा : भारतीय मुसलमानांना सौदीत ‘नो एन्ट्री’!)

कोरोना लसींचा तुटवडा!

महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केली. आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत लस देण्याचे ध्येय आहे, असेही टोपे म्हणाले.

लस कमी असतील तर केंद्राशी बोला, राजकरण नको! – फडणवीस 

आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडून लसीकरणाबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचे बंद करावे, लोकांच्या जिवाशी खेळू नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून देशभरात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्रालादेण्यात आल्या आहेत. भारत सरकार काही वेगळे आहे का? या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणे गरजेचे आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचे आणि हात झटकायचे हे बंद झाले पाहिजे. विरोधकांना म्हणायचे राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचे हे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here