या कारवाईवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ईडीची कारवाई हा काही नवीन विषय़ राहिलेला नाही. छगन भुजबळ यांच्यावरही हेतू पुरस्सर कारवाई करण्यात आली होती आणि सव्वा दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले. केंद्रातील भाजपचे सरकार हे ठरवून करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. हे महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, हे भाजपला भारी पडेल, अशी प्रतिक्रिला काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. हे सुडाचे राजकारण सुरु आहे. कुणाला तरी त्रास देण्यासाठी हे राजकारण होत आहे. कुणालाही तपास यंत्रणांनाच गैरवापर होत आहे. फक्त राजकीय हेतूनेच हे सगळे होत आहे. ५ ते १० वर्षांपूर्वी ही संस्था माहित नव्हती. पण आता ही ईडी गावागावात फिरत आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
(हेही वाचा उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त)
राज्यातील सरकार घालवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, याचे उत्तर आज मिळाले, कितीही काहीही केले तरी सरकार पडणार नाही, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
कर नाही तर डर कशाला, ज्या पद्धतीची माहिती केंद्रीय तपास यंत्रणेसमोर येते त्याप्रमाणे त्या काम करत असतात, कोण कुणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई केली जात नाही, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हणाले.
मुंबई महापालिका लुटण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनी श्रीधर पाटणकर यांना दिला होता. कंत्राटदाराकडून कसे पैसे येतात, शेल कंपन्या, २४ शेल कंपन्यांची नावं, कशाप्रकारे नामीबेनामी इन्व्हेस्टमेंट होती, यावर आता तर ईडीने सुरुवात केली आहे, अजून आयकर विभाग येणं बाकी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी छगन भुजबळ यांनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रींग केले त्या कंपन्यांमधूनही मनी लॉन्ड्रींग केले. सुनील तटकरे यांनी ज्या कंपन्यांमधून केले त्या कंपन्यांमधूनही मनी लॉन्ड्रींग केले. हळूहळू सर्व हिशोब समोर येणार आहे, हा पैसा श्रीधर पाटणकर यांच्या अकाऊंटमधून पुढे कुठे कुठे गेला आहे, हे ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेला कळेल ना तेव्हा उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत. एकही घोटाळेबाजांना सोडणार नाही, मग ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो की त्यांचा मेहुणा असो, त्यांचा डावा हात असो की उजवा हात असो, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
(हेही वाचा ही तर राक्षसी हुकूमशाहीची सुरुवात! संजय राऊत संतापले)
Join Our WhatsApp Community