Shrikant Shinde: कल्याणच्या जागेवरून मोठमोठ्या वल्गना करणारे ठाकरे कुठे आहेत? श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

226
Shrikant Shinde: कल्याणच्या जागेवरून मोठमोठ्या वल्गना करणारे ठाकरे कुठे आहेत? श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल
Shrikant Shinde: कल्याणच्या जागेवरून मोठमोठ्या वल्गना करणारे ठाकरे कुठे आहेत? श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज कल्याण जागेसाठी खासदार श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) नावाची घोषणा केली. श्रीकांत शिंदेंच्या (Shrikant Shinde) नावावर शिक्कामोर्तब होताच त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कल्याण लोकसभेला मोठमोठ्या वल्गना करून आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लढणार असे सांगितलं जात होतं. ते कुठे आहेत? या मतदारसंघात झालेला विकास पाहून त्यांची लढण्याची हिंमत झाली नाही. अशी टीका श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis: निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जयंत पाटील कुठेत? फडणवीसांचा थेट सवाल)

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी थेट गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले, “फडणवीसांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानं मी त्यांचं स्वागत करतो. यावेळी कल्याण लोकसभेतून मोठ्या मताधक्यानं ही जागा निवडून येईल. भाजपचे नेते गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी श्रीकांत शिंदेंसाठी (Shrikant Shinde) आपण काम करणार नाही, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) स्पष्टपणे सांगितलं आहे, त्यामुळं त्यावर जास्त बोलणं योग्य नाही. पण ज्यांचा पर्सनल अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिक राबवला पाहिजे, पक्षाचं नाव घेऊन नाही.”

(हेही वाचा – CBI : दिल्लीत नवजात बालकांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची छापेमारी, ८ बालकांची सुटका)

“पक्षाचं नाव घेऊन युतीचं नाव खराब करण्याचं काम त्यांनी करु नये. गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही. हे असं का वागत आहेत? मतदारसंघाचा विकास केलेला नाही का? तर झालेला आहे. राज्य सरकार किंवा केंद्राचा अजेंडा हे खराब करत आहेत. त्यांच्या विधानाला गोळीबाराची पार्श्वभूमी आहे, त्यांनी स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे. निवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत.” असं मत श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) व्यक्त केलं.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.