महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली; Shrikant Shinde यांची घणाघाती टीका

159
महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली; Shrikant Shinde यांची घणाघाती टीका

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांना भेटण्यासाठी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे. मात्र आज उद्धव ठाकरे आणि उबाठा गट स्वतः च्या स्वार्थासाठी तीन दिवस दिल्लीत येऊन थांबले. मला मुख्यमंत्री करा, असे काँग्रेसजवळ गाऱ्हाणे घालण्यासाठी ते दिल्लीत थांबले होते. आजवर महाराष्ट्राने एवढी लाचार परिस्थिती पहिली नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी (९ ऑगस्ट) केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. शिंदे बोलत होते.

डॉ. शिंदे (Shrikant Shinde) पुढे म्हणाले की, उबाठाने बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून दिली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व सोडले, वैचारिक भूमिकाच राहिली नसल्याने उबाठा खासदारांनी गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी संसदेतून पळ काढला, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. २०१९ ला हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि २०२४ ला ज्यांच्या मतांवर हे निवडून आले त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उबाठाने केले. फक्त स्वार्थासाठी ते केवळ राजकारण करत असल्याचे कालच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. वक्फ बोर्ड विधेयकावर तुम्ही भूमिका का मांडली नाही, असा सवाल डॉ. शिंदे यांनी उबाठा नेत्यांना यावेळी विचारला.

(हेही वाचा – गणेशभक्तांचा कोकण प्रवास करणार खड्डेमुक्त; Nitin Gadkari यांचे वायकरांना आश्वासन)

वक्फ बोर्ड विधेयकावर बोलण्यापूर्वी उबाठाचा पळपुटेपणामुळे

ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले आणि नंतर सत्तेच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. आता पुन्हा लोकसभेत एका विशिष्ट समाजाच्या मतांनी हे निवडून आले आणि याच समाजाच्या सुधारांसाठी संसदेत एक महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आले तेव्हा त्यांचे सर्व नऊ खासदार पळून गेले. मुस्लिम समाजाने तुम्हाला भरभरुन मतदान केले मात्र या समाजाशी संबधित वक्फ बोर्ड विधेयकावर बोलण्याऐवजी पळून गेले. सर्व पक्षाचे नेत्यांबरोबरच शिवसेना, इतर पक्षांच्या नेत्यांनी तसेच विरोधी पक्षाने या विधेयकावर भूमिका मांडली मात्र वैचारिक गोंधळामुळे उबाठा खासदारांनी सभागृहातून पळ काढला आणि विधेयकावर बोलणे टाळले, असे डॉ. शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले. या पळपुटेपणामुळे आपण कोणावर विश्वास ठेवला हे मुस्लिम समाजाने लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मविआतील नेते दररोज नवीन नावे घोषित करतात आणि उबाठा दिल्लीत येऊन लाचारी करतात, असा टोला त्यांनी लगावला. उबाठा मुख्यमंत्री असताना अडीच दिवस देखील मंत्रालयात गेले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी, बहिणींसाठी आणि युवकांसाठी काही केले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करतात मात्र त्यांच्या शाखांमध्ये बॅनर लावून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरतात, अशी टीका डॉ. शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसमावेश विचार करणारे आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी काम आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.