मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची शनिवारी (24 फेब्रुवारी) ठाण्यातील युवा सेनेच्या युवा महोत्सवामध्ये प्रकट मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी गुवाहाटीला जाण्यापासून ते बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी श्रीकांत यांनी अनेक राजकीय टिपण्णी करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. ठाण्यामधील चर्चेत असलेल्या लोकसभेच्या उमेदवारीवरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. (Dr. Shrikant Shinde)
आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता. या दौऱ्यामध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रणशिंग फुंकताना राजीनामा द्या, तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर आव्हान दिले होते. याच आव्हानाचा संदर्भ घेत अवधूत गुप्ते यांनी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा याकडे कसे बघता, असा प्रश्न श्रीकांत शिंदे यांना विचारला.
(हेही वाचा – DCM Devendra Fadnavis : संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल)
श्रीकांत शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, आव्हान कोण देतं आणि त्याला प्रतिसाद काय द्यायचा आपण ठरवायला हवं. हत्तीने आपली चाल चालत राहावी, मागे कोण काय बोलतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय? शिंदे साहेब हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते, अशी टीका त्यांनी यावेळी केली. युवा सेना प्रमुख पद का घेत नाही? असे विचारले असता त्यांनी कोणाला असे वाटायला नको की, नंबर वन पद ब्लॉक आहे. कोणतेही लाभाचे पद मी घेणार नाही, असे आधीच सांगितले होते, असेही त्यांनी यावेळी मुलाखतीदरम्यान सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community