“माझे बाबा…”, Shrikant Shinde यांची वडील एकनाथ शिंदेंसाठी भावनिक पोस्ट

83
"माझे बाबा...", Shrikant Shinde यांची वडील एकनाथ शिंदेंसाठी भावनिक पोस्ट

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भावनिक पोस्ट केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत, गेल्या अडीच वर्षात जनतेने भरभरुन प्रेम दिलं, मी कधीही स्वत:ला मुख्यमंत्री समजलं नसून एक सामान्य व्यक्ती समजलं आणि म्हणून मी सामान्य लोकांमध्ये जाऊ शकलो असं ते म्हणाले. त्यानंतर मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा-लग्नात विनापरवानगी DJ वाजवाल तर होणार कारवाई!

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले की, ‘मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना (Shiv Sena) मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.’

‘कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.’ (Shrikant Shinde)

हेही वाचा-Ajmer Dargah चे होणार सर्वेक्षण; शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने सुनावणीस योग्य मानली

‘सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!’ असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. (Shrikant Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.