बुलडोझर मॅन अशी ओळख असणारे Shrikar Pardeshi मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव

135
बुलडोझर मॅन अशी ओळख असणारे Shrikar Pardeshi मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव
बुलडोझर मॅन अशी ओळख असणारे Shrikar Pardeshi मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव

‘झिरो पेंडंन्सी’साठी सुपरिचित असलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी (Shrikar Pardeshi ) यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयात सचिव पदावर करण्यात आली आहे. याआधी ते उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते.

( हेही वाचा : देशात 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालय सुरू करणार; Union Cabinet च्या बैठकीत मान्यता

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ते सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. त्याआधी पंतप्रधान कार्यालयातील प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यावर जून २०२१ मध्ये श्रीकर परदेशी (Shrikar Pardeshi ) महाराष्ट्रात परतले. मात्र आता महायुती सरकार सत्तेवर येताच त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव पदाचा कार्यभर सोपवण्यात आला आहे.”

श्रीकर परदेशी यांच्याविषयी

श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ या गावातील रहिवाशी आहेत. एमबीबीएस-एमडी शिक्षण पूर्ण करत काही काळ त्यांनी प्रॅक्टिसही केली. २००१ साली यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रातून पहिले येण्याची किमया साधली होती. श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही (Narendra Modi) त्यांच्या कामाची भुरळ पडली. त्यानंतर त्यांना थेट राजधानी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आले होते.(Shrikar Pardeshi )

बुलडोझर मॅन कशी ओळख

दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर असताना वीसमजली इमारतींचे अतिक्रमण त्यांनी जमीनदोस्त केले, तेव्हा नागरिकांनी त्यांना ‘बुलडोझर मॅन’ अशी उपमा दिली होती. त्यांनी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा किताबही पटकावला आहे.(Shrikar Pardeshi )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.