Veer Savarkar : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारचा हिंदुद्वेष; सत्तेत येताच वीर सावरकरांवरील धडा अभ्यासक्रमातून वगळला 

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळाने पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांना मंजुरी दिली आहे.

181

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी विकासाचे राजकारण करण्याऐवजी केवळ हिंदुद्वेषाचे राजकारण केले. यासाठी हिजाबचे समर्थन केले, बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली आणि टिपू सुलतानची जयंती पुन्हा साजरी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सत्तेत येताच काँग्रेस सरकारने आता शालेय पुस्तकातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात या सरकारने जवाहरलाल नेहरू यांचा धडा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयामुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

कर्नाटक सरकारने खरा इतिहास कितीही दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तरी सत्य बाहेर पडणारच आहे. वीर सावरकर यांच्यावरील धडा वगळून सावरकरांवरील माहिती लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी विद्यार्थी समाजमाध्यमांच्या माध्यमातून वीर सावरकर वाचतच आहेत. हा सगळा राजकीय खेळखंडोबा सुरु आहे. स्वतः इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांचा सन्मान केला होता. भाजपाला विरोध करण्यासाठी वीर सावरकर यांना विरोध करणे चुकीचे आहे.
– रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळाने पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये हिंदुद्वेष प्रखरतेने दिसून येत आहे. यामध्ये सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशवराव हेडगेवार, तसेच स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जागी जवाहरलाल नेहरू यांचा धडा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाठ्यपुस्तक पुनर्निरीक्षणासाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या निणर्यानंतर याविषयीची माहिती सर्व शाळांना दिली जाणार आहे, असे राज्याचे शिक्षणमंत्री बंगारप्पा म्हणाले.

(हेही वाचा Veer Savarkar : वीर सावरकरांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी मानवंदना – रणजित सावरकर)

सरकारच्या या निणर्यानंतर आता शाळेतील मुले भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य त्यागलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभ्यासण्याऐवजी ब्रिटिशांसोबत जुळवून घेत त्यांच्या रणनीतीनुसार चालणारे जवाहरलाल नेहरू यांना अभ्यासणार आहेत. इयत्ता 6 वी ते 10 वी च्या सामाजिक अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकात हे बदल करण्यात आले आहेत. मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे आम्ही वीर सावरकर यांचा धडा वगळला आहे, असे शिक्षण मंत्री बंगारप्पा म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.