South Mumbai मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे

लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असतानाच राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरुवात झाली.

223
South Mumbai मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे
South Mumbai मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे

लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असतानाच राज्यातील महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) बिघाडीला सुरुवात झाली. (South Mumbai)

उबाठाचा दावा

हाय प्रोफाईल समाजाला जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (UBT) गटाने आपला दावा केला आहे तर या मतदार संघातील काँग्रेसचे (Congress) माजी खासदार मिलिंद देवरा (Deora) यांनीदेखील या जागेवर आपला हक्क सांगून आघाडीत बिघाडी असल्याचे दाखवून दिले. (South Mumbai)

ठाकरेंची सभा

अद्याप जागावाटप अंतिम झाले नसतानाही उबाठाकडून (UBT) दक्षिण मुंबई मतदार संघावर आपला दावा असल्याचे सांगत राजकीय सभा घेण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात गिरगावात पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सभा घेतली. (South Mumbai)

काँग्रेसचा आक्षेप

गेल्या दोन निवडणुकांत भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांचा मोदी लाटेत विजय झाला आणि सद्याच्या उबाठा गटाने ही जागा आपली असल्याचा दावा केला. त्यावर काँग्रेसचे माजी खासदार देवरा यांनी आक्षेप घेत हा दावा चुकीचा आहे असे स्पष्ट केले. (South Mumbai)

(हेही वाचा – Ind W vs Aus W 2nd T20 : भारतीय महिलांचा ६ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाची मालिकेत १-१ अशी बरोबरी)

काँग्रेसचा उबाठाला टोला

“ही दक्षिण मुंबईची जागा परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार गेल्या ५० वर्षांपासून दक्षिण मुंबईतील मतदारांची सेवा करत आहे. आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही तर काम आणि नाते जपून हा मतदार संघ जिंकला आहे, असा टोला देवरा यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, “कुणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत. जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेसही या जागेवर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते.” (South Mumbai)

देवरांचे वर्चस्व

मिलिंद देवरा यांनीं या मतदार संघाचे २००४ आणि २००९ असे दोन वेळा नेतृत्व केले आहे तर त्यांचे वडील मुरली देवरा हे १९८४ ते १९९८ पर्यंत चार वेळा या मतदार संघातून निवडून आले आहेत. (South Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.