वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अधिकृतपणे समाविष्ट करून घेतल्यानंतरही, कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाद काही संपता संपेना. काल शुक्रवारी पंचतारांकित हॉटेल ट्रायडेंटमध्ये (Hotel Trident) एकत्र बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना इंडी आघाडी संपल्यासारखी आहे, असे विधान केले तर आज शनिवारी (०३ फेब्रुवारी) कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचा समावेश इंडी आघाडीत झालेलाच नाही, असे सांगून त्यांना प्रत्युत्तर दिले. यापुढे देखील किमान समान कार्यक्रम, जागांवाटपावरून वाद वाढण्याचीच चिन्हे दिसत असल्याचे सांगण्यात येते. (Congress-Vanchit)
तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढणार
महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT), कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) यांचे जागावाटपात (Seat sharing) अद्याप एकमत होणे बाकी असताना वंचित आघाडीची यात भर पडल्याने जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी आणखी वाढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Congress-Vanchit)
जागांवर अद्याप चर्चा नाही
महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होण्यापूर्वी किमान सात ते दहा जागांवर वाद होता. तो सुटण्याआधीच आता वंचितने ५-६ जागांची मागणी पुढे केल्याने वाद आणखी काही काळ चिघळणार असे सूत्रांकडून सांगण्यात आले. आंबेडकर यांच्या वंचितने दक्षिण मध्य मुंबईसह (Mumbai South-Central) अकोला (Akola), सोलापूर (Solapur), परभणी (Parabhani), अमरावती (Amaravati) आणि बुलढाणा (Buldhana) या जागांची मागणी केल्याचे समजते. मात्र, वंचितला एक किंवा दोन जागा, उबाठाच्या जागांमधून दिल्या जातील, असे समजते. (Congress-Vanchit)
(हेही वाचा – Congress चा ‘हा’ एकमेव हिंदूत्ववादी चेहरा भाजपच्या वाटेवर)
महाविकास आघाडीवर अविश्वास
शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले की, “जागावाटपावर पुढील टप्प्यावर चर्चा होईल. अगोदर किमान समान कार्यक्रम (Common Minimum Programme) ठरवला जाईल आणि त्यानंतर जागावाटप.” तसेच त्यांनी महाविकास आघाडीची तुलना इंडी आघाडीशी (Indi Alliance) करून या आघाडीची इंडी आघाडी (Indi Alliance) होऊ नये याची काळजी घेणार असल्याचे सांगून त्यांनी महाविकास आघाडीवर एकप्रकारे अविश्वास व्यक्त केल्याची भावना कॉंग्रेसमध्ये व्यक्त केली जात आहे. (Congress-Vanchit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community