- वंदना बर्वे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधल्यानंतर इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) भविष्याला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व सोडावे अशी मागणी विविध पक्षांनी केली असताना राहुल गांधी यांनी हेकेखोरपणा दाखविल्याने इंडी आघाडी इतिहासात जमा होणार याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारार्थ घेतलेल्या रॅलीत आम आदमी पक्ष (आप) आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. केजरीवाल यांच्यावर तोंडसुख घेताना राहुल गांधी यांनी जराही तमा बाळगली नाही. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे सरकार किती कुचकामी आणि बेजबाबदार आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचा – उमरग्याचे MLA Pravin Swami यांच्या आमदारकीवर संकट ? काय आहे नेमकं कारण ?)
थोडक्यात राहुल गांधी यांनी इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) सहयोगी पक्षांना स्पष्ट संदेश दिला की, काँग्रेस कोणत्याही दबावापुढे वाकणार नाही आणि नेतृत्वपदही सोडणार नाही. त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की राष्ट्रीय आघाडीच्या नावाखाली काँग्रेस आता राज्यांमध्ये आपला राजकीय पाया गमावण्यास तयार नाही. त्याच वेळी, राष्ट्रीय आघाडीच्या नावाखाली राज्यांमध्ये काँग्रेसला बाजूला करण्यासाठी मित्रपक्षांच्या दबावाच्या युक्त्या पक्ष आता सहजासहजी स्वीकारणार नाही, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला आहे.
हरियाणा निवडणुकीनंतर चार महिन्यांत ही दुसरी वेळ आहे जेव्हा काँग्रेसने त्यांच्या मित्रपक्षांच्या दबावाखाली आपली निवडणूक रणनीती बदलण्यास नकार दिला आहे. सोमवारी दिल्लीतील सीलमपूरमध्ये राहुल गांधी यांची पहिलीच निवडणूक रॅली झाली. राहुल गांधींच्या या रॅलीनंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या रॅलीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप तसेच केजरीवाल यांच्यावर तीव्र हल्लाबोल केला. आप सरकारच्या अपयशांवर प्रकाश टाकताना राहुल गांधी यांनी मित्रपक्षांना संदेश दिला की काँग्रेस आपल्या अस्तित्वाच्या किंमतीवर कोणालाही आनंदी ठेवण्याचा धोका पत्करणार नाही. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रिठालासारख्या बाहेरील भागांनाही भेट दिली आणि राजधानीतील नागरी सुविधांची दयनीय अवस्था अधोरेखित केली. (I.N.D.I. Alliance)
(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर मंत्री झाले असते, तर….; सावरकरांचा उल्लेख, दाऊदचा दाखला, Vinod Tawde यांची शरद पवारांवर कडवी टीका)
दिल्लीला पॅरिससारखे बनवण्याच्या केजरीवाल यांच्या आश्वासनावर टीका केली. ‘आप’ व्यतिरिक्त, राहुल गांधींची ही भूमिका सपा, तृणमूल काँग्रेस, राजद, शिवसेना यूबीटी सारख्या पक्षांच्या जिव्हारी लागणारी आहे. कारण या सर्वांनाच अशी इच्छा होती की काँग्रेसने आघाडीचे नेतृत्वपद सोडून दुसऱ्याला संधी द्यावी. राहुल गांधींच्या या संदेशानंतर दिल्लीतील पक्षाचे नेतेच नव्हे तर काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनीही आप-केजरीवाल यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. अशात इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हरियाणातील निवडणूक निकालानंतर मित्रपक्षांनी काँग्रेसवर टीका केली होती आणि महाराष्ट्रातील प्रतिकूल निकालानंतर काँग्रेस दबावात येईल अशी इंडी आघाडीला (I.N.D.I. Alliance) खात्री होती. पण दिल्लीच्या निवडणुकीत आप सरकारविरुद्ध आक्रमकतेच्या एका नवीन पातळीवर जाऊन, राहुल गांधी यांनी बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये मित्रपक्षांसमोर भविष्यासाठी राजकीय दबावाची रेषा आखली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community