राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचार सभा चालू आहेत. यातच चौथ्या टप्प्यातील प्रचार सभा थंडावल्या असून, पाचव्या टप्प्यातील प्रचार सभांचा जोर शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधक पक्ष मात्र एकमेकांवर आरोपांच्या फैऱ्या झाडत आहेत. अशातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यात १९९५ च्या दरम्यान जनतेने महायुतीला बहुमत दिले त्यामुळे युतीचे सरकार स्थापन झाले होते. तसेच १९९९ साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं, परंतु मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी सत्ता गेली. मुख्यमंत्रीपदाची लालसा तेव्हाही त्यांच्या मनात होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्याला विरोध होता. असं विधान शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले.
(हेही वाचा – Coronation Year: ३५०वा शिवराज्याभिषेक वर्षसोहळा, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘शिवचरित्रा’वर भव्य उपक्रमाचे आयोजन)
संजय शिरसाट म्हणाले की, १९९५ च्या काळात महायुतीची सत्ता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या सहकार्यामुळे १९९९ पर्यत सत्ता चालली. परंतु १९९९ च्या साली हाती सत्ता येते हे पाहून मुख्यमंत्री कोण या वादातून सत्ता गमावली. त्याच वेळी गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते तर उद्धव ठाकरे यांना सहन झाले नसते. अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
अपक्ष आमदारांनी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करा असा जोर धरला होता. पण त्यावेळी आपणच मुख्यमंत्री व्हावे अशी लालसा उद्धव ठाकरे यांना होती पण शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना ही बाब मान्य नव्हती. असे विधान शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले.
(हेही वाचा – TMC ने पश्चिम बंगालमध्ये घोटाळ्यांचे अड्डे बनवले; PM Narendra Modi यांचा घणाघात)
ठाकरेंच्या मुलाखतीवर संजय शिरसाटांचं प्रतिउत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना सांभाळतात, संजय राऊत (Sanjay Raut) हे प्रत्येक मतदारसंघात वसूली करून मातोश्रीकडे पैसे घेऊन जात आहेत. हे कुठल्याही उमेदवाराला विचारले तरी ते सांगतील. तुम्ही इनकमिंगवाले, आम्ही आऊटगोईंगवाले आहोत. असा टोला ही संजय राऊत यांना लगावला. कार्यकर्त्यांना मदत करण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याचं काम केले जाते. संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले तीच भूमिका आमची आहे. मविआचे जे नेते औरंगजेबाचा उदोउदो करतायेत त्यांचा कळस कापण्याची ही वेळ आहे. महायुती मविआच्या या प्रकाराला उत्तर देईल असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community