सिंधुदुर्गात आघाडीचो भोपळो फुटलो…

70

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली होती. आघाडी सरकार 19 जागांवर आपणच येणार असल्याचा दावा करत होते, पण निकालात मात्र कमळ फुललं आहे. 19 पैकी 11 जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. आता या विजयावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मालवणीतून ट्विट केले आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…असे ट्विट करत त्यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

खुलं आव्हान

देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि
विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…
नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे.
मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत! अशा शब्दांत ट्विट करुन आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला खुलं आव्हानच दिलं आहे.

( हेही वाचा: सिंधुदुर्गात आज राणे समर्थकांची आतषबाजी! सतीश सावंत पराभूत! जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा)

चिठ्ठीद्वारे विजेता घोषित

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत  देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.