राज्यात बहुचर्चेत असलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बरीच चर्चेत होती, निवडणुकीचा निकाल लागताच त्यात भाजपने बँकेवर सत्ता मिळवली आहे, त्यावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर परखड मते मांडली. सिंधुदुर्ग जिंकले आता लक्ष्य महाराष्ट्र आहे. सिंधुदुर्ग जतना बँकेवर माझा नाही, भाजपचा विजय आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता नाही, थोडक्यात हुकली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. सध्या राज्य अधोगतीकडे चालले आहे. या राज्यातील जनतेला सुख-समाधान आणि समृद्धी यावी, यासाठी केंद्राप्रमाणेच राज्यातही भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे, असे म्हणत राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचे भाकीत नारायण राणे यांनी केले.
हा विजय कुणामुळे?
ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी दिलेली साथ. यामुळे हा विजय मिळवला. हा विजय मिळवताना अक्कलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे, त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली आहे. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे. सिंधुदुर्गाचा विजय हा आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. राजन तेली यांनी राजीनामा दिल्यासंदर्भात नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात आता केंद्रापर्यंत आमची सत्ता आहे, राजन यांना कुठेतरी घेऊच. राजन यांच्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील, असेही नारायण राणे यांनी म्हटले.
(हेही वाचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : पोस्टरवॉर सुरु, मुंबईत मात्र नितेश राणेंची धामधूम)
आता पुढे काय?
जिल्हा बँकेनंतर आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. अजून अडीच वर्ष आहे विधानसभा. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजचाच असेल. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय तिकडे आमची सत्ता नाही. थोडक्यात हुकली. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही, असे राणे म्हणाले.
अक्कल आहे म्हणून सत्ता मिळाली
ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी त्यांना दिलेली साथ या मुळे हा विजय मिळवला. हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली आहे. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे. सिंधुदुर्गाचा विजय हा आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आहे. आता आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार आहोत, असे राणे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community