सिंधुदुर्गात आज राणे समर्थकांची आतषबाजी! सतीश सावंत पराभूत! जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा

अवघ्या महाराष्ट्रात प्रतिष्ठेची बनलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी, ३१ डिसेंबर रोजी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला, तेव्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांच्यावर त्यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोप करत त्यांना अटक करण्याची व्यहरचना केली होती. मतदानाच्या दिवशीच या प्रकरणामुळे जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता, दुसऱ्या दिवशी मतमोजणीच्या वेळी मात्र सतीश सावंत यांचा पराभव झाल्याचे समोर आल्यावर राणे समर्थकांनी अक्षरशः जल्लोष केला, फटाक्यांची आतषबाजी केली. या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या आहेत.

बँकेवर भाजपचा विजय 

या निवडणुकीत संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले. या निवडणुकीत १९ जागांपैकी केवळ ८ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला, उर्वरित जागांवर भाजपचा विजय झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले. विशेष म्हणजे सावंत यांच्याच नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ही निवडणूक लढली होती. संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी असलेले भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विलास गावडेंचा पराभव केला.

(हेही वाचा २०२१ : राजकीय शह-काटशहचे वर्ष)

राणे समर्थकांकडून पोस्ट व्हायरल! 

यानिमित्ताने सकाळपासूनच सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये नितेश राणे हे सतीश सावंत यांच्यावर पाय ठेवून उभे आहेत, असे दाखवण्यात आले आणि त्या ठिकाणी ‘गाडलाच’ असे लिहिले आहे. ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

आतापर्यंत आलेला निकाल

 • प्रकाश गवस (भाजप) – पराभूत
  गणपत देसाई (मविआ) विजयी
 • प्रकाश मोर्ये (भाजप) – पराभूत
  विद्याप्रसाद बांदेकर (मविआ) – विजयी
  सुभाष मडव (अपक्ष) – पराभूत
 • प्रकाश बोडस (भाजप) – विजयी
  अविनाश माणगावकर (मविआ) – पराभूत
 • सतीश सावंत (मविघा) – पराभूत
  विठ्ठल देसाई (भाजप) – विजयी
 • महेश सारंग (भाजप) – विजयी
  मधुसूदन गावडे (मविआ) – पराभूत
 • अतुल काळसेकर (भाजप) – विजयी
  सुरेश दळवी (मविआ) – पराभूत
 • राजन तेली (भाजप) – पराभूत
  सुशांत नाईक (मविआ)- विजयी
 • विनोद मर्गज (मविआ)- पराभूत
  संदीप परब (भाजप)- विजयी
 • विकास सावंत (मविआ) – पराभूत
  समीर सावंत (भाजप) – विजयी
 • दिलीप रावराणे (भाजप) – विजयी
  दिगंबर पाटील (मविआ) – पराभूत
 • मनिष दळवी (भाजप) – विजयी
  विलास गावडे (मविआ) – पराभव

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here