प्रवर्ग खुला झाला तरी, सिंदुधुर्गात उमेदवार ओबीसीचाच असणार!

132

ओबीसी आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे सिंधुदुर्गात सुरू असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी प्रवर्ग खुला झाला आहे. तरीही त्या प्रभागात भाजपाकडून ओबीसी उमेदवार निवडणुकीत असणार आहे. असे, आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओबीसी उमेदवार

निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील ४ प्रभागातील निवडणुका येत्या १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून होणार आहे. जरी ओबीसी आरक्षित असलेला मतदारसंघ खुला झाला असला तरी त्या सर्व जागांवर भाजपा ओबीसी उमेदवारच निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची माहिती आमदार नितीश राणे यांनी दिली आहे.

( हेही वाचा : औदुंबराच्या पानावर ‘श्री दत्त गुरू’ अवतरले… )

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला स्थगिती दिली होती. तसेच सध्या जाहीर झालेल्या 106 नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 106 नगर पंचायतीच्या आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर 18 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारने आयोगाने लवकरात लवकर हा डेटा, माहिती मिळवावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.