पंजाबी गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पटियाला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आज, गुरूवारी पंजाबी गायक दलेर मेहंदीचे अपील फेटाळून लावले आहे. पंजाबी गायक दलेर मेहंदी याला पटियाला पोलिसांनी अटक केली आहे. 2018 मध्ये दलेर मेहंदीला कबूतर मारल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दलेर मेहंदीला जामीन मिळाला.
(हेही वाचा – अतिवृष्टीमुळे पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली)
मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा
या निर्णयाला दलेर मेहंदी यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. ज्यामध्ये आज अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दलेर मेहंदीचे अपील फेटाळले आहे. 2003 मध्ये पटियालामध्ये दलेर मेहंदी यांच्यावर कबुतर मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराचे वकील गुरमीत सिंग यांनी सांगितले की, गायक दलेर मेहंदीला 2003 च्या मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रोबेशनवर सोडण्याचा त्यांचा अर्जही न्यायालयाने फेटाळला.
Patiala, Punjab | Singer Daler Mehndi sentenced to two years of imprisonment in a human trafficking case of 2003. He has been taken into custody (by police). His application for release on probation also dismissed by court: Advocate Gurmeet Singh, Complainant's lawyer pic.twitter.com/bHOwcsHAD4
— ANI (@ANI) July 14, 2022
कोण आहे दलेर मेहंदी?
- 1995 मध्ये दलेर मेहंदीचा बोलो तारारारा हा पहिला अल्बम चांगलाच लोकप्रिय झाला होता.
- 1998 मध्ये दलेर मेहंदीच्या तुनक तून या अल्बनला देखील लोकांनी प्रचंड पसंती दिली
- बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली दलेर मेहंदीचा जन्म झाला.
- दलेर मेहंदी हे गायक शिवाय गीतकार, लेखक आणि निर्माता देखील आहे.