पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्येचा तपास करण्यासाठी SIT गठीत करणार

156

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे वारिसेंच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची अर्थाच एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. पत्रकार वारिसे यांच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राज्यभरातील पत्रकारांकडून करण्यात येत होती. याबाबत देवेंद्र फडणवीसांना घोषणा केली आहे.

( हेही वाचा : आत्मदहन करू द्या नाहीतर…रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक, पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष)

SIT  स्थापन करण्याचा निर्णय

या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पत्रकार आणि वारिसे कुटुंबियांनी फडणवीसांना यासंदर्भात पत्र लिहून गंभीर आरोप करण्यात आले होते. यामुळे सरकारने तातडीने पावले उचलून SIT  स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

SIT गठीत करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाचा तपास होणार आहे. यासंदर्भात गृहमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.