मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनेक मंत्री मंत्रालयातील आजच्या कॅबिनेट बैठकीला (Cabinet Meeting) आले नाहीत,कारण ते दिवाळीनिमित्त आपापल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत तसेच छगळ भुजबळ ओबीसी मेळाव्याला आहेत. असे असतानाही मंत्र्यांच्या अनुपस्थितीत शिंदेंच्या मंत्रिमंडळाने आज महत्त्वाचे सहा निर्णय घेतले आहेत.
– मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार (जलसंपदा विभाग)
-राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला.
-बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ (ग्रामविकास विभाग)
– आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता (उच्च आणि तंत्रशिक्षण)
-राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
– १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी (नियोजन विभाग)
(हेही वाचा – Sharad Koli : ठाकरे गटाचे शरद कोळी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल )