Pooja Khedkar प्रकरणामुळे आणखी सहा अधिकारी रडारवर; त्यांचीही प्रमाणपत्रे तपासणार

214
चुकीच्या गोष्टी करून भारतीय प्रशासकीय अधिकारी पदावर पोहचलेल्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे एक एक नवनवीन कारनामे बाहेर येऊ लागले आहेत. यूपीएससीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे त्यांच्या एकूणच यूपीएससीच्या कारभारावर संशय व्यक्त केला गेला. पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. आता तर कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) आणखी सहा अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी आणि सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणानंतर आता यूपीएससी चांगलीच जागी झाली आहे. अपंगत्वाचे आणि नॉन क्रिमीलेयरचे खोटे प्रमाणपत्र तयार करून या पदावर पोहचलेली पूजा खेडकर हिची यूपीएससीची पदवी काढून घेण्यात आली, तिला भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षा देण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. आता यूपीएससीने झाडाझडती सुरु केली आहे. आणखी कुणी पूजा खेडकर नाही ना, याचा तपास यूपीएससीने सुरु केला आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने आरोग्य सेवा महासंचालकांना पत्र लिहून अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा तपासणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापैकी सहा अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
यूपीएससीच्या नियमानुसार, अपंगांच्या राखीव कोट्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित उमेदवार कमीत कमी ४० टक्के अपंग असणे आवश्यक आहे. अशा दिव्यांग उमेदवारांना यूपीएससीकडून वयोमर्यादेत सूट, इतरांपेक्षा अधिकवेळा परीक्षा देण्याची सूट, तसेच परीक्षा केंद्र निवडण्यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.