छत्तीसगढ कोळसा खाण वाटप प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविण्यात आले आहे. दिल्ली राऊज एव्हेन्यू न्यायालयाने हा निकाल दिला आहे. १८ जुलैला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. फौजदारी कायदा कलम 120B, 420 खाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहेत. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी विजय दर्डा आणि एका कंपनीसह सहा आरोपींना दोषी ठरवले आहे.
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह इतरांवरील आरोप निश्चित करताना न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यासाठी १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने IPCच्या कलम 120B, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरविले. न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांमध्ये माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि के.सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांचा समावेश आहे.
(हेही वाचा Khalistani : सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावर खलिस्तानी हल्ला; NIAचे पथक अमेरिकेला जाणार)
Join Our WhatsApp Community