विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) अभूतपूर्व निकालामुळे विधान परिषदेतील ६ जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागा आता महायुतीच्या घटक पक्षांसाठी पर्वणी ठरली आहे. त्या रिक्त जागांवर जे नाराज होते यांची वर्णी लागू शकते. भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधान परिषदेवरील आमदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. त्या सर्वांचा विजय झाल्यामुळे विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) अनेकांना डावलून इतरांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली. परंतु, काही ठिकाणी पक्ष श्रेष्ठींना बंडखोरी रोखण्यात यश आले. त्यामुळे निवडणुकीत ज्या नाराज नेत्यांना डावलण्यात आले होते, त्यांना आता विधानपरिषदेवर संधी दिली जाऊ शकते. सध्या भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके हे विधान परिषदेवर असलेले नेते विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे विधार परिषदेत भाजपाच्या 4 जागा रिक्त झाल्या आहेत. तर शिवसेनेचे आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांचीही एक जागा रिक्त झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधान परिषदेवर अजित पवार गटाची एका जागा नाराजाला संधी मिळणार आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात विधानपरिषदेच्या 12 रिक्त जागांपैकी 6 जागांवर महायुतीच्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपाकडून महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, पनवेलचे माजी महापौर विक्रांत पाटील, पोहरादेवीच्या गुरुगादीचे पीठाधीश धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली. शिवसेनेकडून हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि सांगलीचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांची वर्णी लागली होती. (Assembly Election)
Join Our WhatsApp Community