विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी बाकांवरुन जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता अध्यक्षांकडून नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जयंत पाटील सभागृहात संतापले होते. या संतापात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. सत्ताधा-यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. सत्ताधा-यांनी जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याठी मागणी केली होती. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
निलंबनानंतर विरोधकांकडून सभात्याग
जयंत पाटील यांच्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्ष आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षाकडून सभात्याग करण्यात आला.
( हेही वाचा: वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार नाही; दीपक केसरकर यांची ग्वाही )
Join Our WhatsApp Community