मागील दोन – तीन महिन्यांपासून मणिपूर येथे हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारावरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावर भाष्य केलं पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. बुधवारी, २६ जुलै रोजी स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. मणिपूर पेटवण्यासाठी राहुल गांधी जबाबदार असल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला.
(हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान मोदी करणार राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन)
नेमका प्रकार काय?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदार अमी याग्निक यांनी स्मृती इराणी आणि अन्य महिला मंत्री मणिपूर हिंसेवर कधी बोलणार? असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नानंतर स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली. स्मृती इराणी म्हणाल्या की, “राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमधील घटनांवर बोलण्याची हिंमत तुमच्यात कधी येणार? लाल डायरीबद्दल बोलण्यास तुमच्यात हिंमत आहे का? काँग्रेस शासित राज्यांत महिलांवर होणाऱ्या अत्याचाविरोधात बोलण्याची तुमची हिंमत आहे का?”
When will you have the guts to discuss Rajasthan,
When will you have the guts to discuss Chhattisgarh,
When will you have the courage to talk about what’s happening in Bihar,
When will you have the courage to talk about the Red Diary… pic.twitter.com/reDcgZhcrT
— BJP (@BJP4India) July 26, 2023
पुढे बोलतांना स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख करत म्हटलं की, “राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये जात पेटवण्याचं काम केलं, यावर तुम्ही कधी बोलणार आहात?”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community