स्मृती इराणींनी केले भारतीय विद्यार्थ्यांचे ‘बहुभाषी’ स्वागत

88

युक्रेन मधून दिल्लीत दाखल झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे विमानतळावर जाऊन स्वःत इंडिगो विमानात प्रवेश करून अनोखे स्वागत केले. स्मृती इराणींनी नागरिकांना सुखरूप देशात आणणाऱ्या इंडिगोच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.

(हेही वाचा – बाप-बेटा जेल जायेंगे! संजय राऊत यांनी केले ट्विट)

‘बहुभाषी’ स्वागतास विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद

स्मृती इराणी म्हणाल्या, ” देशात आपले स्वागत. आपला परिवार श्वास रोखून वाट बघत आहे. अत्यंत कठीण काळात आपण अद्भुत धैर्य दाखविले. इंडिगोत कार्यरत मान्यवरांचेही कौतुक केले पाहिजे. ” विशेष म्हणजे यावेळी स्मृती इराणी यांनी विद्यार्थी वर्गाशी मल्याळम, बंगाली, गुजराती आणि मराठीत संवाद साधला. संबंधित राज्यांच्या विद्यार्थ्यांनी स्मृती इराणी यांच्या ‘ बहुभाषी ‘ स्वागतास टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. राजकारणापलीकडे बहुभाषी अभिनेत्री आणि बहुमुखी कलाकार स्मृती इराणींना इंग्रजी, हिंदी, बंगाली, पंजाबी, मराठी आणि गुजराती भाषेचे उत्तम ज्ञान आहे. एकेकाळी मनोरंजन मालिकेद्वारे भारताच्या घराघरात पोहचलेल्या स्मृती इराणी मोदी सरकार आणि भाजपमध्ये महत्वाच्या नेत्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

२२० भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

यासह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विमानतळावर भारतीयांचे स्वागत केले. २२० भारतीय विद्यार्थी विमानाने मायदेशी परतले. युक्रेनमध्ये अडकलेल्या २२० भारतीय विद्यार्थ्यांना इस्तंबूलमार्गे मायदेशात विमानने आणण्यात आले आहे. विमानतून उतरलेल्या एका विद्यार्थिनीला मी विचारलं. ‘तू कुठल्या राज्यातली आहे?’. यावर तिने उत्तर देत सांगितलं, ‘मी भारतीय आहे’. अजूनही विद्यार्थ्यांना आपण मायदेशात आल्याचा विश्वास बसत नाहीए. विद्यार्थ्यांचा लवकरात लवकर कुटुंबीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. जितेंद्र सिंह यांनी गुलाबाची फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळी ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देण्यात आल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.