…तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं? ओबीसी-मराठा आरक्षण वादावर Raj Thackeray यांचे परखड भाष्य 

192
...तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं?ओबीसी-मराठा आरक्षण वादावर Raj Thackeray यांचे परखड भाष्य 
...तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं?ओबीसी-मराठा आरक्षण वादावर Raj Thackeray यांचे परखड भाष्य 

राज्यात सध्या आरक्षणाच्या (Reservation) मागणीवरून ओबीसी आणि मराठा (OBC and Maratha) हे दोन समाज आमनेसामने आले आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी (OBC Leader) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र्य प्रवर्गातून द्यावे, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे राज्य सरकार आरक्षणाच्या चक्रव्यूहात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Sreeja Akula : श्रीजा अकुला टेबल टेनिस कन्टेंडर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय )

येत्या काही महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील. या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याच संदर्भात निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (२४ जून) रोजी राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, जातीय विष महाराष्ट्रात कधी नव्हते. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा नेता असेल पण असं जर ते करणार असतील तर पुढच्या पिढीनं जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Bhartruhari Mahtab : राष्ट्रपतींनी दिली महताब यांना प्रोटेम स्पीकरची शपथ)

त्याशिवाय ज्याप्रकारे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे तसं महाराष्ट्रात यावरून रक्तपात होईल अशी भीती राज ठाकरेंनी वर्तवली. तसेच मी जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल. विकासापेक्षा जातीपातीत तेढ निर्माण करणे, त्यातून हाताला मते लागतायेत हे जेव्हा कळलंय त्यामुळे हे त्याचप्रकारे पुढे जाणार. समाजाने ही गोष्ट समजणं गरजेचे आहे असंही राज ठाकरे  यांनी सांगितले. (Raj Thackeray)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.