दोन दिवसांपूर्वी पुण्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, सोलापूरातील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर ज्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. शाईफेक करण्याचे प्रकार वाढल्यामुळे आता राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मंगळवारी एका लग्नासाठी गेले होते. त्यावेळी विवाह ठिकाणीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्यावेळी सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलिसांमुळे शाईफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. विजयकुमार देशमुख यांच्यावर शाईफेक केल्यानंतर घटनास्थळी जोरदार गोंधळ उडाला होता. मात्र, त्यानंतर शाई फेकणा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
( हेही वाचा: शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणार ‘सलोखा योजना’; मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता )
दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर ज्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने शाई फेकली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Join Our WhatsApp Community