‘त्या’ जुळ्या बहिणींचा नवरा राहणार कायम

86

सोलापुरात एकाच तरुणासोबत मुंबईतील दोन उच्चशिक्षित तरुणींनी एकाच वेळी लग्न केल्याने देशभरात या विवाहाची चर्चा आहे. अतुल उत्तम अवताडे या तरुणाने रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणींसोबत एकाचवेळी लग्नगाठ बांधली. लग्नाला एक दिवस होत नाही तोच अकलुज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाने दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयाने यात अतुलवार कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालयाने फेटाळली याचिका

लग्न केल्यापासून अतुलला अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र आता अतुल आवताडेवर कारवाई करण्यास सोलापूर न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. अतुलवर नोंदवण्यात आलेल्या अदखलपात्र गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अकलुज पोलिसांनी याचिका दाखल केली होती. सोलापूर जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे. खटल्यातील तक्रारदार हा पिडीत पक्ष म्हणजेच संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असावा. या खटल्यात तक्रारदार पीडित पक्ष नसल्याने या याचिकेची दखल घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात अतुलवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तसेच त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जुळ्या बहिणींशी लग्न केलेल्या व्यक्तीविरुद्ध नोंदवलेल्या अदखलपात्र गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार मिळविण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सीआरपीसीच्या कलम 198 चा हवाला देऊन न्यायदंडाधिकाऱ्यांनी अदखलपात्र खटल्याची चौकशी करण्याची परवानगी नाकारली.

(हेही वाचा बुलेट ट्रेनसाठी २२ हजार झाडे तोडा – मुंबई उच्च न्यायालय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.