सोलापूर-गाणगापूर ST चा अपघात: ट्रॉमा केअर सेंटरचा विषय मार्गी लावणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

101

सोलापूर-गाणगापूर बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात 30-35 जणं गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोट-मैंदर्गी या मार्गावर हा अपघात झाला असून अक्कलकोट – मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास झाला. या घटनेनंतर गंभीर प्रवाशांवर अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर असल्यामुळे उपचारास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

(हेही वाचा – सोलापूर-गाणगापूर बसला भीषण अपघात, 30-35 जणं गंभीर जखमी)

ट्रॉमा केअर सेंटरचा विषय लवकर मार्गी लावणार – मुख्यमंत्री

विशेष म्हणजे अक्कलकोट येथे ट्रॉमा केअर सेंटर तयार असूनही उद्घाटनाअभावी रूग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले. यासह ट्रामा केअर सेंटरची इमारत नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यासाठी अद्याप स्टाफ मंजूर करण्यात आलेला नाही. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली असून तात्काळ मंजूर व्हावी, अशी विनंती केली होती आणि या विनंतीनुसार, अक्कलकोट येथील ट्रॉमा केअर सेंटरचा विषय लवकर मार्गी लावणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची दखल

सोलापूर-गाणगापूर बसला झालेल्या भीषण अपघाताची दखल मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली असून सोलापुरातील ट्रॉमा केअरचा विषय लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घडलेला प्रकार मुख्यमंत्र्यांना सांगितला होता, यानंतर अपघातातील जखमींना सर्वोत्तोपरी मदतीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 50 हजार

या अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे, अशा प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.