सोलापूर लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी अन्य चार गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावातील साधर्म्य असलेले सुनीलकुमार शिंदे हेदेखील एक उमेदवार आहेत. (Solapur LS Constituency)
चार गायकवाड कोण?
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी मतांच्या विभागणीचा फायदा भाजपाला होऊ नये यासाठी उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र बहुजन समाज पक्षाचे (बसपा) बबलू गायकवाड, अपक्ष सुभाष गायकवाड, प्रमोद गायकवाड, आणि महासिद्ध गायकवाड हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेतच. (Solapur LS Constituency)
(हेही वाचा – Bandra Pali Hill Hawkers : आता फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवरही कारवाई)
सुनीलकुमार शिंदे
सोलापूर मतदार संघासाठी एकूण ४३ अर्ज स्वीकृत झाले असून यामध्ये एक अर्ज सुनीलकुमार शिंदे यांचाही आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव माहीत नसलेले एकही कुटुंब सोलापूर मतदार संघात नाही. त्यामुळे नावातील साधर्म्य असलेल्या उमेदवारमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्राणिती शिंदे यांना मोठा फटका बसू शकतो. (Solapur LS Constituency)
भाजपाला फायदा
महायुतीकडून भाजपाचे (BJP) आमदार राम सातपुते हे उमेदवार असून अपक्ष गायकवाड आणि सुनीलकुमार शिंदे यांना मिळणाऱ्या मतांमुळे सातपुते यांचा दिल्ली मार्ग सोपा होण्यास काही प्रमाणात तरी मदत होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Solapur LS Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community