Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या आडून हिंसाचार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरु आहे त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे वचन दिले आहे.

101
छत्रपती शिवरायांविषयी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर DCM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला तीव्र संताप

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, राज्यात मराठा आंदोलनाच्या आडून हिंसाचार सुरु असल्याचा आरोप करत हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (३१ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. (Maratha Reservation)

मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरु आहे त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे वचन दिले आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र, याचवेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Pune GRP : प्रियकरासोबत पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हेड कॉन्स्टेबलसह एनजीओ कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल)

ज्या प्रकारे बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरं जाळणे, विशिष्ट लोकांना लक्ष्य करणे, दवाखाने जाळणे ही कृती काही लोकांनी केली आहे. अशा प्रकारची जी कृती केली आहे ती चुकीची आहे. त्यावर कारवाई होणार आहे. जिथे शांततापूर्ण आंदोलन सुरु आहे तिथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र हिंसेला कुठेही थारा देणार नाही. या संदर्भात आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation)

काही राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते देखील या हिंसाचारात सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्यासंदर्भातले सगळे पुरावे मिळाल्यानंतर त्याचीही माहिती तुम्हाला दिली जाईल. काही लोक जाणीवपूर्वक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर आम्ही कारवाई करणार आहोत. काही लोक फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.