‘काही लोकांना फक्त रडण्याची सवय’; भाषेच्या वादात पंतप्रधान Narendra Modi यांनी सीएम स्टॅलिनला सुनावले खडेबोल

173
‘काही लोकांना फक्त रडण्याची सवय’; भाषेच्या वादात पंतप्रधान Narendra Modi यांनी सीएम स्टॅलिनला सुनावले खडेबोल
‘काही लोकांना फक्त रडण्याची सवय’; भाषेच्या वादात पंतप्रधान Narendra Modi यांनी सीएम स्टॅलिनला सुनावले खडेबोल
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ६ एप्रिलला तामिळनाडूतील रामनाथपुरम (Ramanathapuram) येथे नवीन पंबन पुलाचे उद्घाटन केले. यानंतर, पंतप्रधान मोदींनी एका जाहीर सभेलाही संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूच्या विकासाबद्दल भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथील रामनाथपुरममध्ये न्यू पंबन ब्रिजचे (Pamban Bridge) उद्घाटन केले. (Narendra Modi)
दरम्यान जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यातील द्रमुक सरकार (DMK Govt) आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकात केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी २०१४ च्या तुलनेत तिप्पट अधिक पैसे दिला आहे. असे असताननाही काही लोकांना विनाकारण रडत राहण्याची सवय असते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील डीएमके सरकार आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला.

(हेही वाचा – सिंहस्थ कुंभमेळ्यातील सोईसुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करा; धर्माचार्य Madhavdas Rathi Maharaj यांची मागणी)

पंतप्रधान मोदींनी स्टॅलिनवर टीका केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काही लोकांना फक्त रडण्याची सवय असते. ते म्हणाले की, तामिळनाडूमधील रेल्वे प्रकल्पांसाठी वाटप करण्यात आलेल्या निधीत जवळजवळ सात पट वाढ झाली आहे. तसेच २०१४ पूर्वी रेल्वे प्रकल्पासाठी दरवर्षी फक्त ९०० कोटी रुपये मिळत होते. या वर्षी तामिळनाडूचे रेल्वे बजेट ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सरकार रामेश्वरम स्थानकासह ७७ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करत आहे. यासोबतच, पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या १० वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते आणि महामार्गांवर बरेच काम झाले आहे. 

(हेही वाचा – Kalyan Dombivli मधील ६५ बेकायदेशीर बिल्डिंगचं प्रकरण तापलं; नेमकं काय कारण? वाचा)

भाषा वादावर पंतप्रधान काय म्हणाले?
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील स्टॅलिन सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, तमिळ भाषा आणि तमिळ वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सरकार सतत काम करत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.