नॅशनल हेराल्ड कथित भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ईडीकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नुकतीच ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित असोसिएटेज जर्नल्स लिमिटेड (AJL) या कंपनी संबंधित ७०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेवर ताबा घेण्याची कारवाई केली होती. नंतर आता हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले ‘नॅशनल हेरॉल्ड’ वृत्तपत्र इ.स. २००८ साली बंद पडले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश साम्राज्यशहांना विरोध करण्यासाठी १९३८ मध्ये सुरू केलेले हे काँग्रेसचे मुखपत्र होते. हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० साली ते विकत घेतले. यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना नोव्हेंबर २०१० साली झाली होती. या कंपनीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सर्वात मोठा म्हणजे ७६ टक्के वाटा होता.
(हेही वाचा पश्चिम बंगालमधील हिंसाचारप्रकरणी CM Yogi Adityanath यांनी ममता बॅनर्जींना सुनावले; म्हणाले…)
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र २००८ पासून आर्थिक तोटा होत असल्याचे कारण देत बंद करण्यात आले होते. काँग्रेसने पुढे जाऊन ‘एजेएल’ला ९० कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले. पक्षाने सांगितले की, हे पैसे वृत्तपत्राला परत आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात मदत करण्यासाठी होते. तथापि, वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही आणि एजेएल काँग्रेसचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरले.
Join Our WhatsApp Community