National Herald मध्ये हवाला व्यवहार? सोनिया-राहुल यांची ED कडून फेरतपासणी

99

नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीला हवाला लिंक सापडल्याचे सांगितले जात आहे. नॅशनल हेराल्ड आणि संबंधित संस्थांमध्ये हा हवाला व्यवहार झाल्याची माहिती असून असे सांगितले जात आहे की, यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानतंर ईडी नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करू शकते. याशिवाय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी केली जाणार आहे. बुधवारी ईडी अधिकाऱ्यांनी यंग इंडिया लिमिटेडचे नॅशनल हेराल्ड त्याच्या संलग्न कंपन्या आणि तिसऱ्या गटात हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले असल्याचा दावा ईडीच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!)

दिल्लीत असणाऱ्या हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीदरम्यान ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सच्या व्यवहाराचे पुरावे कागदपत्रांमध्ये सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंग इंडियाच्या कार्यालयाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडी मोठी कारवाई करणार असून ही कारवाई काय असणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

सोनिया-राहुल यांची ED कडून फेरतपासणी

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने 21 जुलै रोजी 3 तास, 26 जुलै रोजी 6 तास आणि 27 ऑगस्ट रोजी 3 तास चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. ईडीने जूनमध्ये 5 दिवसांत राहुल गांधींची 50 तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान सोनिया आणि राहुल गांधी यांनी यंग इंडियाकडून कोणताही लाभ घेतला नसल्याचे सांगितले होते. यंग इंडियाकडून मिळालेल्या कागदपत्रांनंतर, ईडी दोघांच्याही उत्तरांनी समाधानी नसल्याने या उत्तरांची ईडी पुन्हा तपासणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.