भाजपाच्या ४० खासदारांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या सभापतींची भेट घेतली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी द्रौपद्री मूर्मूना (Droupadi Murmu) ‘पुअर लेडी’ म्हटले होते. यावरून आता सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपाच्या खासदारांनी दि. ३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी आणि पप्पू यादव यांच्याविरुद्ध संसदेच्या विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपतींचा अवमान केल्याचा आरोप आहे.
( हेही वाचा : CM Devendra Fadnavis यांना वर्षा निवासस्थानी जाण्यास भीती वाटते का?)
भाजपा (BJP) खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांना पत्र लिहले आहे. यामध्ये विरोधी पक्षाच्या खासदाराचे विधान हे दुर्देवी आणि राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारे आहे. तसेच राष्ट्रपतींचा केलेला अपमान हा भारतातील आदिवासी समाजाचा अवमान असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर दोन्ही नेत्यांवर आदिवासी विरोधी मानसिकता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Sonia Gandhi)
नेमक्या काय म्हणाल्या सोनिया गांधी?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ च्या पार्श्वभूमीवर अभिभाषण केले होते. त्यावर त्यांनी भाजपने केलेल्या योजनांचा आणि विकासकामांचा भाषणातून उल्लेख केला होता. यावेळी त्यांना दमल्यासरखे झाले होते. त्या अभिभाषणावर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींना ‘पुअर लेडी’ म्हणत अवमान केला होता. तसेच दुसरीकडे सोनिया गांधी यांचे पूत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे असल्याचे भाष्य केले होते. सोनिया गांधी यांच्या या विधानावेळी प्रियंका गांधी-वाड्रा आणि राहुल गांधी त्याठिकाणी उपस्थित होते. (Sonia Gandhi)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community