काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची नोटीस देण्यात आली आहे, हा हुकूमशाहीचा परिणाम आहे. यामुळे देशात लोकशाही जिवंत राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.
जनता भाजपला जागा दाखवून देईल
केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापर होत आहे. काँग्रेससह विरोधकांचा छळ केला जात असला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. उलट जनता आमच्या पाठिशी राहील आणि भाजपला जनता त्यांची जागा दाखवून देईल. जे काही सुरु आहे ते जनता पाहत आहे, त्याचे भाजपला परिणाम भोगावे लागतील, या विषयावर आम्ही चर्चा करून धोरण ठरवणार आहे. त्यासाठी जनता आमच्यासोबत असणार आहे, असेही थोरात म्हणाले.
काँग्रेस या कारवाईला विरोध करेल
आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. मागील ७ वर्षे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्याला आम्ही राजकीय आणि कायद्याच्या माध्यमातून सामोरे जाऊ. आतापर्यंत ईडीकडून ज्या कारवाया झाल्या आहेत, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, असे दिसते, असे काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे म्हणाले. तर या कारवाईला काँग्रेसचा कार्यकर्ता विरोध करेल, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.
Join Our WhatsApp Community