सोनूच्या कार्यालयाचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण! सोशल मीडियात मात्र चर्चेला उधाण

ही कारवाई मोदी सरकारकडून सूड भावनेने करण्यात आली आहे, असा आरोप नेटकरी करत आहेत.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने मोठ्या प्रमाणात समाजसेवा केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कामगारांचे स्थलांतर असो किंवा दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा असो यासाठी सोनूने बरीच कामे केली. अशा सोनूच्या कार्यालयाचे बुधवारी आयकर विभागाने सर्वेक्षण केले. त्यामुळे सोशल मीडियात मात्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ही कारवाई मोदी सरकारकडून सूड भावनेने करण्यात आली आहे, असा आरोप नेटकरी करत आहेत.

सोनूकडे किती आहे संपत्ती?

सोनू सूदकडे एकूण १३० कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या २ दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात २६०० चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर जवळपास ४ बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास ३५० सीडीआय कार आहे. या कारची किंमत ६६ लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू ७ ही कार देखील आहे. या गाडीची किंमत ८० लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत २ कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

(हेही वाचा : ओबीसी आरक्षणावर मंत्रिमंडळाने काढला ‘हा’ तोडगा! किती ठरणार फायदेशीर?)

काय म्हणतात नेटकरी?

शालेय विद्यार्थ्यांसाठी दिल्ली सरकारच्या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अभिनेता ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर काही दिवसांनीच हा सर्व्हे करण्यात येत आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो. पण तो मोदी सरकारची वाहवा करत नाही त्याचे हे फळ आहे, अशा आशयाच्या टिपण्या नेटकरी करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here