- खास प्रतिनिधी
राज्यात २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि दोन दिवसांत, २३ नोव्हेंबर २०२४ ला निकाल लागले. भाजपा-शिवसेना (शिंदे)-अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असलेल्या महायुतीला अभूतपूर्व यश (२३० जागा) मिळाले. मात्र, निकाल लागून १० दिवस झाले तरीदेखील अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. (Newly Elected MLA)
भाजपाच्या धक्कातंत्राचीही चर्चा
राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत राजकाराण्यांसह सर्वसामान्य जनतेचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडला असला तरी काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री हा भाजपाचा असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, भाजपाच्या धक्कातंत्राचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Newly Elected MLA)
(हेही वाचा – एकामागून एक मशिदींच्या खाली मंदिरे असल्याच्या हिंदूंच्या दाव्यांनंतर Muslim करत आहेत प्रार्थनास्थळ कायद्याची ढाल)
किमान २९ जागाही विरोधी पक्षाला नाही
काही दिवसांत १५ व्या विधानसभेची स्थापना होईल. या विधानसभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी पक्षाला इतके मोठे बहुमत पहिल्यांदाच मिळाले असून भाजपाच्या १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ४१ जागा निवडून आल्या. २८८ पैकी २३० आमदार सत्ताधारी पक्षाचे असून विरोधी पक्ष नेता निवडीसाठी आवश्यक असलेल्या किमान २९ जागाही विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठाला जनतेने दिल्या नाहीत. विरोधी पक्षात शिवसेना उबाठाचे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १० आमदार अशा एकूण ४६ जागा निवडून आल्या. (Newly Elected MLA)
(हेही वाचा – Amit Shah यांच्यासोबत अजित पवारांची भेट होणार का ?)
आमदारांची शपथ, अध्यक्षांची निवड
महायुतीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर शपथ घेतील. त्यानंतर १५ व्या विधानसभेतील सर्व आमदारांचा शपथविधी ७, ८ आणि ९ या दिवशी होणार असून आमदारांच्या शपथविधीनंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल.
आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबर २०२४ असे तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Newly Elected MLA)
(हेही वाचा – Dachigam Encounter: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या ठार)
हिवाळी अधिवेशन नागपूरला
त्यानंतर नव्या राज्य सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ डिसेंबर २०२४ पासून सुरू होईल. सध्या तरी अधिवेशन कालावधी एक आठवड्याचा निश्चित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. (Newly Elected MLA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community