South Mumbai Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबईत २००४ नंतर प्रथमच महायुतीकडून महिला उमेदवार

शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार म्हणून यामिनी जाधव या निवडणूक रिंगणात उतरत असून विद्यमान शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांना टक्कर देणार आहेत.

286
South Mumbai Lok Sabha 2024 : दक्षिण मुंबईत २००४ नंतर प्रथमच महायुतीकडून महिला उमेदवार

दक्षिण मुंबईतून (South Mumbai) अखेर शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची उमेदवारी घोषित झाली आहे. विशेष म्हणजे सन २००४नंतर प्रथमच महायुतीच्यावतीने महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार म्हणून १९९६मध्ये भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी विजय प्राप्त केला होता. त्यानंतर शेवटची निवडणूक त्यांनी २००४मध्ये निवडणूक लढवली होती. पण त्यानंतर महायुतीच्यावतीने कोणाही महिला उमेदवाराला संधी देण्यात आली नव्हती, पण शिवसेनेच्यावतीने यंदा यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्याने तब्बल २० वर्षांनी दक्षिण मुंबईतील महायुतीच्या मतदारांना महिलेला मतदान करता येणार आहे. (South Mumbai Lok Sabha 2024)

जाधव या सावंतांची हॅट्रीक कशी रोखतात?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघावर (South Mumbai Lok Sabha) भाजपाने दावा करून आपला उमेदवार देण्याचा निर्धार करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना निवडणुकीला कामाला लावले होते. त्यानुसार लोढा आणि नार्वेकर यांनी मतदार संघ बांधणीला सुरुवात केली होती. परंतु अखेर या मतदार संघातून शिवसेनेचा खासदार असल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आणि या मतदार संघातून भायखळ्याचे आमदार यामिनी जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २० वर्षांनी शिवसेना भाजपा युतीचा दक्षिण मुंबईतील उमेदवार महिला लाभला आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार म्हणून यामिनी जाधव या निवडणूक रिंगणात उतरत असून विद्यमान शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांना टक्कर देणार आहेत. सावंत हे विजयाची हॅट्रीक करायला निघाले असून यामिनी जाधव हे त्यांची हॅट्रीक कशी रोखतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (South Mumbai Lok Sabha 2024)

(हेही वाचा – Banking Security Solution : बँकांना सर्वंकष सुरक्षा देणारं वन एक्स नेमकं काय आहे?)

शिवसेना भाजपाची युती झाल्यानंतर…

शिवसेना भाजपाची युती झाल्यानंतर १९९६मध्ये दक्षिण मुंबईतून भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांना उमेदवारी दिली होती. त्यात जयवंत मेहता यांनी काँग्रेसचे मुरली देवरा यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर १९९८मध्ये युतीच्या उमेदवार म्हणून जयवंतीबेन मेहता यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण या निवडणुकीत जयवंतीबेन मेहता यांचा मुरली देवरा यांनी १९ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर १९९९मध्ये पुन्हा युतीच्या उमेदवार म्हणून जयवंतीबेन मेहता निवडणूक रिंगणात उतरल्या आणि त्यांनी काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांचा सुमारे दहा हजार मतांनी पराभव केला होता. (South Mumbai Lok Sabha 2024)

भायखळ्यासारख्या मतदार संघात आणली विजयश्री खेचून…

पुन्हा २००४ मध्ये जयवंतीबेन मेहता यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु या निवडणुकीत मेहता यांचा दहा हजार मतांनी पराभव झाला आणि मिलिंद देवरा हे विजयी झाले. परंतु आता मिलिंद देवरा हे शिवसेनेत असून राज्य सभेचे सदस्य आहेत. त्यातच ही जागा शिवसेनेला भाजपाने सोडून महायुतीचा उमेदवार म्हणून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे देवरा यांची साथ त्यांना लाभणार आहे. यामिनी जाधव या आमदार असल्याने भायखळ्यासारख्या मतदार संघात त्यांनी विजयश्री खेचून आणत या मतदार संघात शिवसेनेच्या आमदाराची पाटी लावली. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतही भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांच्याप्रमाणेच यामिनी जाधव या विजयश्री खेचून आणत १९९९ नंतर प्रथमच महिला खासदाराची नोंद करतील असे बोलले जात आहे. (South Mumbai Lok Sabha 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.