South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबईतून नार्वेकरांना निवडणूक जाणार जड

शिवसेना विरोधात दिलेल्या निकालाचा बदला घेण्यासाठी उबाठा शिवसैनिक सज्ज

261
South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबईतून नार्वेकरांना निवडणूक जाणार जड
South Mumbai Lok Sabha : दक्षिण मुंबईतून नार्वेकरांना निवडणूक जाणार जड
विशेष प्रतिनिधी, मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार (South Mumbai Lok Sabha) संघातून भाजपच्यावतीने विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Ad Rahul Narvekar) यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांनी आता या मतदारसंघांमध्ये फिरुन जनतेच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा होती, परंतु मराठी चेहरा म्हणून राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असली तरी शिवसेना पक्ष संपवण्यामध्ये नार्वेकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याने याचा राग प्रत्येक उबाठा शिवसेनेच्या मनात खदखदत आहे. त्यामुळेच नार्वेकर निवडणुकीत उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत उबाठा शिवसैनिक असल्याचे बोलले जात आहे. (South Mumbai Lok Sabha)

 यांचे नाव जवळपास निश्चित

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार (South Mumbai Lok Sabha) संघातून सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदा म्हणून निवडून आल्याने शिवसेना भाजप महायुतीत ही जागा शिवसेनेकडेच राहणार होती. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या देवरा यांना राज्य सभेवर पाठवत एकप्रकारे भाजपने या जागेवर आपला दावा पक्का केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानसभेचे अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची नार्वे चर्चेत होती. परंतु त्यातील राहुल नार्वेकर (Ad Rahul Narvekar) यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून त्यांनी मागील काही दिवसांपासून वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघात फिरुन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. (South Mumbai Lok Sabha)

त्याचा बदला शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही

नार्वेकर यांनी मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केल्यापासून उबाठा शिवसेनेचा सैनिक आक्रमक झालेला पहायला मिळत असून नार्वेकर जर या निवडणुकीत उभे राहणार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसैनिक उभा असेल. शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार, नार्वेकर यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. पण त्याचे दु:ख शिवसैनिकांना नाही. पण शिवसेना पक्ष संपवण्याचे काम हे नार्वेकर यांनी केले आहे, त्यामुळे याचा बदला शिवसैनिक घेतल्याशिवाय राहणार नाही. नार्वेकर जर या निवडणुकीत उतरणार असतील तर त्यांच्याविरोधात शिवसैनिक पेटून उठणार आहे. मुंबई ही शिवसेनेची आहे आणि मुंबई ही ठाकरेंची आहे हे आम्ही त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असेही काही वरळी आणि शिवडी भागातील शिवसैनिकांचे म्हणणे आहे. (South Mumbai Lok Sabha)

(हेही वाचा – ED चा रोहित पवारांना धक्का; कन्नड साखर कारखान्याची १६१ एकर जमीन जप्त)

या दोन मतदारसंघांमध्ये नार्वेकर यांना अधिक धोका

नार्वेकर यांच्यासाठी कुलाबा आणि मलबारहिल मतदारसंघ पोषक असून भायखळा मतदारसंघात त्यातल्या त्यात मते मिळू शकतील, परंतु शिवडी आणि वरळी या दोन मतदारसंघांमध्ये मराठी मतदार अधिक प्रमाणात असल्याने कट्टर शिवसैनिक अधिक प्रमाणात असल्याने या दोन्ही मतदारसंघांमध्ये नार्वेकर यांच्या विरोधातील वातावरण अधिक असेल असेही बोलले जात आहे. (South Mumbai Lok Sabha)

मिलिंद देवरा यांची वैयक्तिक मते भाजप उमेदवाराला मिळू शकतील

दरम्यान, पोलिसांच्या गुप्त अहवालानुसारही नार्वेकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही, पण अरविंद सावंत यांचे पारडे मागील दोन टर्मपेक्षा अधिक जड आहे. सावंत यांना आता मुस्लिमांचीही मते मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांचे पारडे अधिक असल्याचे बोलले जात आहे. मिलिंद देवरा हे शिवसेनेत आले असल्याने त्यांची वैयक्तिक मते ही भाजप उमेदवाराला मिळू शकतील असे जरी बोलले जात असले तरी सावंत यांना शह देण्यासाठी मिलिंद देवरा यांच्याशिवाय पर्याय नाही. पण देवरा यांची निवडणूक लढवण्याची शक्यताच मावळली असली तरी देवराच सावंत यांच्या विरोधात कडवे आव्हान तयार करू शकतात असेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजप नार्वेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवतात की अन्य उमेदवाराचा शोध घेऊन त्यांना उभे करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (South Mumbai Lok Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.