MLA Mehboob Ali यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, मुस्लिम लोकसंख्या वाढलीय, आता भाजपची राजवट…

मुघल राजवटीशी भाजपच्या कारकीर्दीची तुलना

171
MLA Mehboob Ali यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, मुस्लिम लोकसंख्या वाढलीय, आता भाजपची राजवट...
MLA Mehboob Ali यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, मुस्लिम लोकसंख्या वाढलीय, आता भाजपची राजवट...

सपाचे आमदार मेहबूब अली (MLA Mehboob Ali ) यांनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौरमध्ये एक वादग्रस्त विधान केले. भाजपला इशारा देत मेहबूब अलू म्हणाले की, आता मुस्लिम लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे भाजपची (BJP) राजवट संपणार आहे. मुघलांनी ८०० वर्ष राज्य केले त्यांना कायम सत्तेत राहता आले नाही मग भाजप काय आहे, असा सवाल ही मेहबूब अली (MLA Mehboob Ali ) यांनी उपस्थित केला. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : आयुर्वेदिक औषधांच्या प्रचार, प्रसारावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी भर द्यावा; Union Minister Prataprao Jadhav यांचे आवाहन

बिजनौरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा आहे. तसेच अली यांनी भाजप (BJP) आरक्षण आणि संविधानाच्या विरोधात असल्याचे ही सांगितले.

कोण आहेत महबूब अली?

२००२ मध्ये महबूब अली (MLA Mehboob Ali ) पहिल्यांदा खंथ मतदारसंघातून आमदार झाले. यानंतर मेहबूब अली यांनी २००७ च्या उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवले. त्यामध्ये त्यांचा विजय झाला असून प्रतिस्पर्धी उमेदवार मंगल सिंग यांचा पराभव झाला.

त्यानंतर २०१२ आणि २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी विजय मिळवला. अखिलेश यादवांच्या सरकारमध्ये ते २०१५ साली मंत्रिमंडळ फेरबदल झाल्यावर त्यांना रेशीम आणि वस्त्रउद्योग मंत्री करण्यात आले होते. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना लघु पाटबंधारे खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.