
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषद घेत उदयनराजे भोसले यांनी मागणी केली आहे. (Udayanraje Bhosale)
हेही वाचा-Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास
उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले, “लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. लोकांना एकत्रित केलं आणि त्यातून स्वराज्याची निर्मिती झाली. बाहेरून होणारे आक्रमण महाराजांनी परतवून लावले. हे कोणाच्या जोरावर? सर्व समाजाच्या जोरावर स्वराज्याला योग्य दिशा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आपण आज त्यांच्यामुळे मोकळा श्वास घेत आहोत. पण आज काय चाललंय?” (Udayanraje Bhosale)
“आपण लोकशाहीत वावरत आहोत. पण कोणीही उठायचं आणि काहीही वक्तव्य करायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. मग सांगितलं जात की कारवाई केली जाईल. या लोकशाहीत केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी विधाने केली जातात. आता सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या काळात माझं प्रामाणिक मत आहे की एक विशेष कायदा पास केला पाहिजे. कायदा असा पाहिजे की परत कोणी काही बोलण्याचं धाडस केलं नाही पाहिजे. ” (Udayanraje Bhosale)
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलण्याचं कोणी धाडस करता कामा नये. याबाबत अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कमीत कमी १० वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त रुपयांचा दंड झाला पाहिजे, अशी तरतूद करण्याची गरज आहे. अशा घटनांची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे, अशीही तरतूद असली पाहिजे. तसेच अशा प्रकरणातील दोषारोपपत्र किमान ३० दिवसांत दाखल झालं पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल सहा महिन्यांत लागला पाहिजे, असा कायदा केला पाहिजे.” असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. (Udayanraje Bhosale)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community