हिवाळी अधिवेशनासाठी खास मोबाईल ॲप; मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

74

नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांची निवासाची व्यवस्था पुरविण्याचे सूक्ष्म आणि अचूकपणे नियोजन करावे. तसेच अधिवेशनकाळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲप तयार करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

( हेही वाचा : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, पहा क्षणचित्रे)

मंत्रालयातील परिषद सभागृहात मंगळवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ च्या प्रस्तावित निवास व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, आहार व्यवस्था, वाय-फाय व्यवस्था, प्रसिद्धीमाध्यमांची व्यवस्था आदींचा सविस्तर आढावा चव्हाण यांनी घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करा!

  • मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करावी. ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.
  • आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावे. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे.
  • निवास व्यवस्थेचे नियोजन करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींच्या चालकांची व्यवस्था, तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी.
  • स्वच्छतेसाठी तैनात कर्मचाऱ्यांची माहिती दर्शनी फलकांवर लावावी. नियुक्त मनुष्यबळ योग्य गणवेशात राहील याची खबरदारी संबंधितांनी यंत्रणांनी घ्यावी.
  • हिवाळी अधिवेशनाच्या काळात करण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधांची एकत्रिक माहिती असणारे मोबाईल ॲप तयार करावे जेणेकरून त्या ॲपवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.