पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून त्यांना ईडी कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी जामीन अर्ज दाखल केला असून या अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश विशेष पीएमएलए न्यायालयाकडून ईडीला देण्यात आले आहेत.
विशेष न्यायालयाचे आदेश
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी सध्या वाढल्या आहेत. मनी लॉंड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर सुटकेसाठी संजय राऊत यांच्याकडून जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या जामीन अर्जावर 16 सप्टेंबर पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
शिवसेना खासदार संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्यात दोषी असल्याचे सांगत ईडीने मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. गोरेगावातील म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्या कंपनीला देण्यात आले होते. पण प्रविण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने हा भूखंड परस्पर एका खासगी विकासकाला विकत पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीकडून करण्याक आला आहे.
खासगी विकासकांना विकण्यात आलेल्या भूखंडाच्या या व्यवहारात काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community