राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सोमवारी, रात्री १२:३० वाजता अटक करण्यात आले आहे. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची संपूर्ण दिवाळी तुरुंगात जाणार असल्याचे दिसतेय. यासह सकाळी साडेबारा वाजल्यापासून दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. ईडीकडून विशेष कोर्टाकडे १४ दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
(हेही वाचा-अजित पवारांच्या अडचणी वाढल्या! कोणी केली कारवाई?)
Mumbai: Special PMLA court sends former Maharashtra Minister Anil Deshmukh to ED custody till November 6 in connection with extortion and money laundering case pic.twitter.com/F0EFJehJ8W
— ANI (@ANI) November 2, 2021
१०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण भोवले
अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलामार्फत कारण पुढे करून ईडीकडून वेळ मागितला होता. मात्र देशमुख हे वेळ देऊनही ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते. दरम्यान ईडीने एका पाठोपाठ एक असे चार महिन्यांत पाच समन्स देशमुख यांना पाठवले होते.
ईडीकडून तिसरी अटक
अनिल देशमुख १ नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता दाखल झाले असता तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली आहे. मंगळवारी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणात ईडीकडून ही तिसरी अटक असून यापूर्वी देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि खाजगी सचिव कुंदन शिंदेला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community