हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या आघाडीत फूट पडली. कारण आपने २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघातही आपने उमदेवार उतरवले आहेत.
आप आणि काँग्रेस यांच्यामधील आघाडी करण्यासंदर्भातील चर्चा फिस्कटली आहे. कारण ‘आप’ला १० किंवा १० पेक्षा जास्त जागा हव्या होत्या. पण, ३ पेक्षा जास्त जागा देण्यास काँग्रेस तयार नव्हती. ‘आप’चे हरियाणाचे (Haryana) प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सोमवारी सकाळीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, सायंकाळपर्यंत तोडगा निघाला नाही, तर आप ९० जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करेल. आप-काँग्रेसमधील चर्चेचे काय झाले, याचे उत्तर मिळण्याआधीच ‘आप’ने 20 उमेदवार जाहीर केले.
(हेही वाचा Ind vs Ban, Test Series : बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पंत, बुमराह संघात; श्रेयस, हार्दिकला डच्चू)
हरियाणा (Haryana) विधानसभेच्या ज्या ११ जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. तिथे आम आदमी पक्षाने उमेदवार दिले आहेत. यात उचाना कला मतदारसंघातून पवन फौजी, मेहममधून विकास नेहरा, बादशाहपूरमध्ये बीर सिंह सरपंच यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर नारायगडमधून गुरपाल सिंह, समालखामधून बिट्टू पहेलवान, दाबवली मतदारसंघातून कुलदीप गदराना, रोहतकमधून बिजेंद्र हुड्डा, बहादूरगढमधून कुलदीप चिकारा, बादली विधानसभा मतदारसंघातून रणबीर गुलिया, बेरी मतदारसंघात सोनू अहलावत आणि महेंद्रगढ मतदारसंघातून मनीष यादव यांना ‘आप’ने उमेदवारी दिली आहे. या सगळ्या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार उतरवलेले आहेत.
Join Our WhatsApp Community