विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर महाविकास आघाडीत (मविआ) अंतर्गत वाद विकोपाला गेले आहेत. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही होणार असून, मविआ या निवडणुकांमध्ये एकत्र लढणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. (Mahavikas Aghadi)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) खासदार अमोल कोल्हेंना उद्देशून खोचक टिप्पणी केली. “अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला सल्ला कमी द्यावा,” असे म्हणत वडेट्टीवारांनी कोल्हेंना टोला लगावला. कोल्हेंनी काँग्रेसवर टीका करताना “काँग्रेस अजूनही मोडलेली पाठ सरळ करू शकत नाही, तर ठाकरे गट झोपेत आहे,” असे वक्तव्य केले होते. त्यावर वडेट्टीवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. (Mahavikas Aghadi)
दरम्यान, मविआच्या पराभवाचे कारण जागावाटपातील घोळ असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले. “जागा वाटपात वेळ घालवणे, हे षडयंत्र होते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लक्ष्य करत, “जागावाटपात काँग्रेसने राष्ट्रवादीला एक जागा देण्यासाठी १७ दिवस घोळ घातला. काहींना वाटत होते की, आम्ही जिंकू आणि मुख्यमंत्रिपद घेऊ,” असा टोला लगावला. (Mahavikas Aghadi)
मविआतील अंतर्गत संघर्ष स्थानिक निवडणुकीसाठी घातक ठरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मविआला एकत्रित राहून पुढील वाटचाल करणे अपेक्षित होते. मात्र, पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे राजकीय फाटाफूट उघड झाली आहे. (Mahavikas Aghadi)
विशेषतः, काँग्रेस आणि ठाकरे गटामधील समन्वयाचा अभाव, तसेच राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे मविआचा राजकीय प्रभाव कमी होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या अंतर्गत वादांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तीन पक्ष वेगळ्या मार्गाने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Mahavikas Aghadi)
मविआतील या फाटाफुटीमुळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला राजकीय लाभ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, मविआची आगामी राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mahavikas Aghadi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community